ब्रेकिंग न्यूज – ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचं निधन !

ब्रेकिंग न्यूज – ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचं निधन !

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंतगराव कदम यांचं निधन झालंय. मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालायात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज संपली. आजच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सांगली जिल्ह्यातील एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. अत्यंत हालाखीच्या स्थितीमध्ये त्यांनी परिस्थितीशी संघर्ष करत भारती विद्यापीठ सारखी शैक्षणिक संस्था स्थापन करुन त्यांनी ती जगभारात नावारुपाला आणली. अनेक देशविदेशातील विद्यार्थ्या त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. राजकारणातही ते बडे प्रस्थ होते. पहिल्यापासून ते काँग्रेसमध्ये होते आणि शेवटपर्यंत त्यांनी काँग्रेस कधीही सोडली नाही.

COMMENTS