राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब!

राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब!

मुंबई – विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रस्ताव आला, तो‌ एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रितसर प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. या १२ जागा जून महिन्यात भरणे अपेक्षित होते. मात्र, राज्यपालांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत या नियुक्त्या पुढे ढकलल्या होत्या. कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा हा प्रस्ताव राज्यपाल मंजूर करणार का हे पाहण गरजेचं आहे.

काँग्रेसची काल मध्यरात्री एक वाजेपर्यंत विधानपरिषद उमेदवारांबाबत खलबतं झाली. या बैठकीत रजनी पाटील किंवा मोहन जोशी किंवा सत्यजित तांबे, माणिक जगताप किंवा मुझफर हुसेन, सचिन सावंत किंवा नसीम खान आणि नगमा किंवा अनिरुद्ध वायकर ह,यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. या यादीत नव्यानेच राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांचं देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले
शिवाजी गर्जे, मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख आदिती नलावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.

शिवसेना

शिवसेनेकडून सुनील शिंदे, शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जाणारे सचिन अहिर, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, युवासेना पदाधिकारी, राहुल कनाल, सूरज चव्हाण आणि सलग तीन वेळा शिरुरचे खासदार राहीलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचंही नाव या यादीत असल्याची माहिती आहे.

COMMENTS