परभणी- उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू !

परभणी- उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू !

परभणी – उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ह्रदयविकाराचा झटका येऊन तुकाराम काळे या शेतक-याचा मृत्यू झाला आहे. नवीन पिककर्जाच्या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. मागील दोन दिवसांपासून सुरू आहे परभणीमध्ये शेतक-यांचं उपोषण सुरु आहे.

उपोषण स्थळावर असताना वैजनाथ काळे यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यादरम्यान उपचारासाठी मानवत येथे रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे परभणीतील शेतक-यांकडून सरकारचा निषेध केला जात आहे. तसेच पीकविमा प्रशासनाकडून दिला जात नसल्याचा आरोपही जिल्ह्यातील काही शेतक-यांनी केला आहे.

COMMENTS