परळीत कोणाचं पारडं जड, वाचा मतदानोत्तर चाचणीतील अंदाज!

परळीत कोणाचं पारडं जड, वाचा मतदानोत्तर चाचणीतील अंदाज!

परळी – महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान आज पार पडलं. या निवडणुकीचा निकाल 24 तारखेला लागणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी विविध माध्यमांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. यानुसार भाजप- शिवसेना महायुतीचं सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीनुसार 288 पैकी महायुतीला 243 जागा मिळतील, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 41 जागा मिळतील असा अंदाज आहे.

mahapolitics exit poll इथे क्लिक करा

दरम्यान या एक्झिट पोलनुसार सर्वात जास्त गाजलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. तर धनंजय मुंडेंचा पराभव होणार असल्याचं दिसत आहे.परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंरतु या निवडणुकीतही पंकजा मुंडेच विजयी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

महापॉलिटिक्सचा एक्झिट पोल

दरम्यान महापॉलिटिक्सने केलेल्या सर्व्हेनुसार या मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचा विजय होणार असून पंकजा मुंडे यांना धक्का बसणार असल्याचा अंदाज आहे.

COMMENTS