पवारांनी आधी पक्षाकडं आणि मग जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, पंकजा मुंडेंचा उपरोधिक सल्ला !

पवारांनी आधी पक्षाकडं आणि मग जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, पंकजा मुंडेंचा उपरोधिक सल्ला !

बीड – भाजपच्या नेत्या आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या विजय संकल्प मेळाव्यावरुन पंकजा मुंडेंनी ही टीका केली असून गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना बीड इथं येऊन चक्क जाहीर सभा घ्यावी लागते हेच आमचं यश असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या पक्षात नेत्या नेत्यात एकी नाही त्यांनी काय आम्हाला टक्कर द्यावी अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे. तसेच पवारांनी अगोदर पक्षाकडं लक्ष द्यावं. मग जिल्ह्याकडे असा उपरोधिक सल्लाही पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

दरम्यान स्व.गोपीनाथ मुंडे यांचा पराजय करण्यासाठी अख्ख तत्कालीन मंत्रीमंडळ जिल्ह्यात तळ ठोकून होतं. परंतु झालं काय तर मुंडेसाहेब हे लाखोच्या मताधिक्याने निवडून आले अशीच स्थिती यावेळी ही कायम राहील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था खूप कठीण झाली असून पक्षातीलच नेते एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत असल्याची टीकाही पंकजा मुंडे यांनी केली आहे.

 

COMMENTS