भाजपनं राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिल्यानंतर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?, पाहा

भाजपनं राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिल्यानंतर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?, पाहा

नवी दिल्ली – भाजपनं नवीन टीम तयार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण चेहय्रांना संधी देण्यात आली आत्रा एकनाथ खडसे यांना मात्र डावललं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

एकूण 13 जणांना राष्ट्रीय सचिव म्हणून नेमण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले 4 नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशकं आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन करुन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाच्या जबाबदारीचा सहर्ष सविनय स्विकार करत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS