पंकजा मुंडेंना भाजप देणार केंद्रात हे महत्त्वाचं पद ?

पंकजा मुंडेंना भाजप देणार केंद्रात हे महत्त्वाचं पद ?

मुंबई – भाजपनं राज्याची  कार्याकरणी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे या कार्यकारणीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसत आहे. नवी कार्यकारणी निवडताना फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखले जाणारे विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना अलगद बाजून करण्यात आलं. विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना केवळ कार्यकारणी सदस्य म्हणून घेण्यात आलंय. त्यांना कुठलंही महत्त्वाचं पद दिलं गेलं नाही. खडसे यांना डावलताना त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे उपाध्यक्ष करण्यात आलंय. पंकजा यांच्या बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनाही उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे.

दरम्यान पंकजा मुंडे यांना मात्र काहीही न देता त्यांना केंद्रात महत्त्वाचं पद दिलं जाणार अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना केंद्रात कोणतं पद मिळणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडे यांना भाजपचं महिलांचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या हे पद राज्यातच म्हणजेच विजया रहाटकर यांच्याकडे आहे. त्यांची मुदत संपत आली आहे. त्यामुळेच त्यांच्या जागी आता पंकजा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

COMMENTS