“बाकी निकाल स्पष्टच आहेत”, निवडणुकीआधीच पंकजा मुंडेंनी स्वीकारला पराभव!

“बाकी निकाल स्पष्टच आहेत”, निवडणुकीआधीच पंकजा मुंडेंनी स्वीकारला पराभव!

बीड – बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडत आहे.
परंतु निवडणुकीआधीच भाजपने पराभव स्वीकारला असल्याचं दिसत आहे. लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या ट्वीटमुळे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी विधानसभेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही पंकजा मुंडे यांना पराभवाची धूळ चारल्याचं दिसत आहे.

तसेच आमच्याकडे पर्याप्त संख्याबळ नाही. तरीही आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीला सामोरे जात आहोत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला इकडेही यशस्वी होत आहे. आम्ही जिल्ह्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.कालपर्यंत शिवसेना आमच्यासोबत होती, आज मात्र नाही. पंकजा मुंडे शरीराने इथे नाहीत पण मनाने आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व होत असही त्या म्हणाल्या.

दरम्यान बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादीची औरंगाबाद येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्या शिवकन्या सिरसाठ यांचे नाव अध्यक्षपदासाठी तर नागरगावचे जिल्हा परिषद सदस्य जयसिंह सोळंके यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी या दोन्ही नेतियांचा विजय होईल असं बोललं जात आहे.

COMMENTS