उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात उलथापालथ !

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात उलथापालथ !

उस्मानाबाद – जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत जिल्ह्यात उलथापालथ झाली आहे. राणा पाटील आणि तानाजी सावंत यांच्या समर्थकांचा विजय झाला असून राणा पाटील यांच्या समर्थक अस्मिता कांबळे या अध्यक्षपदी तर तानाजी सावंत यांचे पुतणे उपाध्यक्ष पदी विजयी झाले आहेत. 30 विरुद्ध 24 मतांनी हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.राणा पाटील यांना शह देण्यासाठी महाविकास कामाला लागली होती मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान नंदुरबारमध्ये काँग्रेस – भाजपने समसमान जागा जिंकल्याने सत्ता स्थापनेचा तिढा वाढला आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 23 जागा जिंकल्या आहेत. याठिकाणी शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार असून शिवसेना, भाजपसोबत जाते की काँग्रेससोबत जाते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल
एकूण जागा 56

जाहीर झालेले निकाल 56

काँग्रेस 23
भाजपा 23
शिवसेना 7
राष्ट्रवादी 3
अपक्ष – 00

COMMENTS