उस्मानाबाद – पालिकेत शिवसेनेला शह देऊन राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष मदत करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला ?

उस्मानाबाद – पालिकेत शिवसेनेला शह देऊन राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष मदत करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला ?

उस्मानाबाद – उस्मानाबाद पालिकेतील सभापती निवडीत शिवसेनेला शह देऊन राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष मदत करण्याचा भाजपचा प्रयत्न फसल्याची चर्चा मंगळवारी (ता. १) राजकीय वर्तूळात रंगली. सभापती निवडीच्या सभेत भाजपने ऐनवेळी बहिष्कार टाकल्याने संकटात आलेल्या शिवसेनेनेही सभेवर बहिष्कार टाकल्याने पीठासीन अधिकारी डॉक्टर चेतन गिरासे याना कोरमअभावी सभा तहकूब करावी लागली. दरम्यान राष्ट्रवादीच्या मनसुब्यावर मात्र पाणी फेरले गेले.

पालिकेतील ३९ नागरसेवकापैकी राष्ट्रवादीचे १७, शिवसेनेचे ११, भाजपचे ८, काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे ३९ सदस्य आहेत. जनतेतून निवडूण आलेले नगराध्यक्ष शिवसेनेचे असून शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने पालिकेची सत्ता काबीज केली आहे. शिवाय ६ विषय समित्यांच्या सभापतीपैकी भाजपकडे ४ सभापतीपदे आहेत. १ सेना आणि १ काँग्रेस असे सभापदीपद वाटून घेतले आहेत. दरम्यान मंगळवारी ऐनवेळी भाजपने सभापती निवडीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. जनतेची कामे होत नसल्याचे सांगत भाजपने असा पवित्रा घेतल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताकुलकर्णी यांनी सांगितले.

पालिकेच्या सत्तेत सहभाग, राज्यात तसेच केंद्रात सत्ता तरीही कामे होत नसल्याचे कारण पुढे केल्याने भाजपची राजकीय खेळी सेनेने ओळखली. त्याच वेळी राष्ट्रवादीने आपले पत्ते खुले केले. योग्य संधी साधत सर्वच समित्यांसाठी नामांकनपत्र भरले. त्यामुळे सर्वच सभापतीपदे राष्ट्रवादीच्या गोटात जाण्याची चिन्ह दिसू लागली. तेव्हा सेनेनेही आपला पवित्रा बदलला. आज होणाऱ्या निवडी पुढ ढकलण्यासाठी भाजप पाठोपाठ सेनेनेही विशेष सभेवर बहिष्कार टाकला.  त्यामुळे गणपूर्ती अभावी  कामकाज होऊ शकले नाही.  पिठासीन अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली.

दरम्यान भाजपची खेळी राष्ट्रवादीला फायदा मिळवून देणारी ठरली. मात्र हा फायदा प्रत्यक्ष पदरात पाडूण घेण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे. पुढील सभेत काय चित्र राहणार, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS