मित्र पक्षातील युवा कार्यकर्त्यानच केला ओमराजेंवर चाकू हल्ला?

मित्र पक्षातील युवा कार्यकर्त्यानच केला ओमराजेंवर चाकू हल्ला?

उस्मानाबाद – उस्मानाबादमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाल्यामुळे जिल्ह्यासह राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. पडोळी (नायगाव) येथे एका तरुणाने हा हल्ला केला असून या हल्ल्यात खासदार ओमराजे निंबाळकर जखमी झाले आहेत. आज सकाळी ओमराजे निंबाळकर हे
शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गावात रस्त्यावरून चालत जात असताना ही घटना घडली आहे. एका तरुणाने हातात हात देवून दुसऱ्या हाताने त्याने चाकू हल्ला केला आहे. पोटावर झालेला वार हातावर आणि मनगटावर, हातातील घड्याळवर बसल्याने खासदार निंबाळकर जखमी झाले आहेत. परंतु त्यांची प्रकृती सध्या सुखरूप असल्याची माहिती आहे.

दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करणारा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचं उघड झालं आहे. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे हा कळंब भाजपा आयटी सेलचा तालुका अध्यक्ष आहे. अजिंक्य अजूनही फरार असून अजिंक्यने ओमराजेंवर हल्ला केला असल्याचू माहिती आहे. यापूर्वी त्याने ओमराजे यांच्याविरोधात फेसबूकची पोस्टही टाकली होती. यावेळी शिवसेनेला नव्हे तर राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यामुळे त्यानेच हा हल्ला केला असल्याची चर्चा आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS