चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांचं आंदोलन!

चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांचं आंदोलन!

मुंबई – भूखंड घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत आज विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आंदोलन केले. काल राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते. परंतु विधानसभेतील कामकाजातून हे आरोप काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे ही हुकूमशाही असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

https://www.facebook.com/groups/1495760087335031/permalink/2400760170168347/

दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी एक भूखंड राखीव होता. शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांनी खेळाच्या मैदानाची ही जागा हडप केली आणि ती आपली असल्याचं दाखवलं. या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला.मात्र याबाबत तक्रार झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले.

तेव्हा महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली. मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्सची असल्याचा निकाल दिला असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. परंतु हे सर्व आरोप चंद्रकांत पाटील यांनी फेटाळले आहेत.

COMMENTS