पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया !

पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया !

नवी दिल्ली – आगामी निवडणुकीत पंतप्रधान होण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. ‘राजकीय आयुष्यात मला माझ्या योग्यतेपेक्षा खूप अधिक मिळालं आहे. त्यामुळे मी कोणत्याही शर्यतीत नाही. पंतप्रधानपदाच्याही नसल्याचं गडकरींनी म्हटलं आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान ‘मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. मंत्री म्हणून मी खूप समाधानी आहे. त्यामुळे मला पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची इच्छा नसल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी निवडणुकीत भाजपलाच पूर्ण बहुमत मिळणार असून नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS