सत्तेवर येण्यासाठी अनेक आश्वासने दिली, ती आज आठवतही नाहीत – नितीन गडकरी

सत्तेवर येण्यासाठी अनेक आश्वासने दिली, ती आज आठवतही नाहीत – नितीन गडकरी

मुंबई – २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना आम्ही सत्तेत येऊ असे वाटले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यावेळी अनेक आश्वासने दिली ती आता आठवतही नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच उद्धव ठाकरेंबाबत बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवेसेनेचे चांगले नेतृत्व केले आहे. मराठी माणसाबद्दल त्यांना आपुलकी आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवे. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. असही गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांच्याबाबतही गडकरी यांनी वक्तव्य केलं असून शरद पवार यांना राजकारणात कोणीही ओळखू शकत नाही. पवार यांना कृषी, ग्रामीण, शैक्षणिक, पक्ष संघटन आणि सामाजिकसह सर्वच बाबींचे ज्ञान आहे. ही शरद पवार यांची जमेची बाजू असून पवार यांची खटकणारी म्हणजे ते काय बोलतात आणि काय करतात हे कळतच नसल्याचंही गडकरी यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS