निष्क्रियता आणि भ्रष्टाचार ही आधीच्या सरकारची वैशिष्टये – नितीन गडकरी

निष्क्रियता आणि भ्रष्टाचार ही आधीच्या सरकारची वैशिष्टये – नितीन गडकरी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. निष्क्रियता आणि भ्रष्टाचार ही आधीच्या सरकारची वैशिष्टये होती. पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या साडेचार वर्षात सुशासन, व्यवसाय सुलभता आणि विकासाभिमुख कारभार केला असल्याचा दावा नितीन गडकरींनी केला आहे. ते दिल्लीच्या रामलीला मैदानावर भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये बोलत होते.

दरम्यान राफेलवर काँग्रेसने जे आरोप केले ते फ्रान्स सरकारने फेटाळले आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली, राज्यसभेत व्होटबँकच्या राजकारणामुळे तिहेरी तलाकचा अध्यादेश पुन्हा आणावा लागला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र येत आहेत. ही संधीसाधू आघाडी आहे. नरेंद्र मोदी विरोधातील द्वेषाला आधार बनवून हे एकत्र येत आहेत अशी टीकाही गडकरींनी केली आहे.

COMMENTS