छोटा पेंग्विन खूश असेल – निलेश राणे

छोटा पेंग्विन खूश असेल – निलेश राणे

मुंबई – मुंबई नाइट लाइफची मागणी पूर्ण झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल, असं ट्वीट करत
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे.सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला आहे त्यावरुन त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाइट लाइफला परवानगी मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. अशातच आता आहे.सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यावरुन निलेष राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात निलेश राणे यांनी वादग्रस्त विधान केल्याने शिवसैनिकांनी काही ठिकाणी त्यांचे पुतळेही जाळले होते. या घडामोडी ताज्या असतानाच आता नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले.  छोटा पेंग्विन खूश असेल, त्याच्या मुंबई नाइट लाइफची मागणी त्याने देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार चालू झाले. असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

COMMENTS