राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल

नवी मुंबई – राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे गावातील राष्ट्रवादी पक्षाचा नगरसेवक मुनावर पटेल याने रिक्षा चालक सुलतान शेख व त्याच्या पत्नीला उचलून आणून आपल्या कार्यालयात बेदम मारहाण केली तसेच पूर्व वैमनस्यातून रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांना मुनावर पटेल याने धमकावले असल्याचा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कार्यालयात डांबून ठेवल्याने या भयभीत झालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी त्यांची सुटका होण्यासाठी कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते.अखेरीस या प्रकरणी थेट पोलिस आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे तक्रार केल्यावर पोलिस आयुक्तांनी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन मुनावर पटेल याला अटक करण्याचेही आदेश दिले आहेत.

COMMENTS