शिवसेनेला पाठिंबा नको, शरद पवारांच्या भेटीपूर्वी सोनिया गांधींना आलं ‘हे’ पत्र!

शिवसेनेला पाठिंबा नको, शरद पवारांच्या भेटीपूर्वी सोनिया गांधींना आलं ‘हे’ पत्र!

नवी दिल्ली – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 10 जनपथ वरील निवासस्थानी पोहोचले आहेत. पवारांच्या या भेटीपूर्वी सोनिया गांधी यांना आलेल्या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदने सोनिया गांधी यांना पत्र पाठवले असून यामध्ये शिवसेनेला पाठिंबा नको असं या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सोनिया गांधी आता काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान आज सकाळी शरद पवार यांनी राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. सत्तास्थापन करण्याबाबत शिवसेनेलाच विचारा असे उत्तर शरद पवारांनी दिले होतं. तसेच सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे का याबाबत विचारले असता कसली चर्चा, कोणाशी चर्चा असंही पवार म्हणाले होते. या वक्तव्यानंतर खळबळ उडाली होती.

त्यानंतर आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 10 जनपथ वरील निवासस्थानी पोहोचले आहेत. पवारांच्या या भेटीपूर्वी सोनिया गांधी यांना आलेल्या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदने सोनिया गांधी यांना पत्र पाठवले असून यामध्ये शिवसेनेला पाठिंबा नको असं या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सोनिया गांधी काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS