उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी ?

उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी ?

सातारा – सातारा लोकसभेची पोटनिवडणुक विधानसभेसोबतच होणार आहे. याबाबतची घोषणा आज निवडणूक आयोगानं केली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु सध्या तरी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांनाच उमेवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी जिल्हा अध्यक्ष सुनील माने आणि श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील हेही इच्छुक आहेत. परंतु उदयनराजेंविरोधात सक्षम आणि अनुभवी म्हणून श्रीनिवास पाटील योग्य उमेदवार असल्याने त्यांचे नाव पवार यांनी अंतिम केले असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान राज्याच्या विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे पोटनिवडणुकीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सातारा पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही निवणूक आता विधानसभा निवडणुकीसोबत चाॆगलीच गाजणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS