“तुम्ही इतरांचे बाप काढता, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?” राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका!

“तुम्ही इतरांचे बाप काढता, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?” राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका!

नवी मुंबई – राष्ट्रवादीकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तुम्ही इतरांचे बाप काढता, तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?” असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ‘बाप’ काढल्यानंतर राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी वक्तव्य करताना तारतम्य बाळगायला हवं होतं. तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. कोणतंही वक्तव्य विचारपूर्वक करायला हवं, अन्यथा राष्ट्रवादीही त्यांना चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

तसेच सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपाची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? असा सवालगी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS