…तोच फॉर्म्युला राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर ठेवला !

…तोच फॉर्म्युला राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर ठेवला !

मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे पुढची रणनीती ठरवण्यासाठी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकत्रित येऊन सरकार स्थापनेचा प्रयत्न सुरु आहे. पदांच्या समसमान वाटपाचा मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेतली. मात्र त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य महाआघाडीतही सत्तावाटपाचा नवा तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीनेही भाजपप्रमाणेच शिवसेनेसमोर 50-50 चा फॉर्म्युला ठेवला असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेपेक्षा आमचे केवळ दोन आमदार कमी आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदासाठीचा आमचा दावा चुकीचा नाही,’ असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा तर नंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या या मागणीला शिवसेना कसा प्रतिसाद देणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

COMMENTS