राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर, राम शिंदेंची घेतली भेट!

राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर, राम शिंदेंची घेतली भेट!

सोलापूर – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एका आमदाराने भाजपची साथ सोडली आहे. माढा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कारण सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन बबनराव शिंदेंनी राम शिंदे यांची भेट घेतली आहे. राम शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असुन माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, रश्मी बागल, आमदार दिलीप सोपल आणि आता बबनराव शिंदे हेही पक्षांतर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला बबनराव शिंदे यांनी दांडी मारली होती. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर आता त्यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

COMMENTS