‘या’ महापालिकेत महाशिवआघाडीचा पहिला विजय, राष्ट्रवादीचा महापौर!

‘या’ महापालिकेत महाशिवआघाडीचा पहिला विजय, राष्ट्रवादीचा महापौर!

कोल्हापूर – राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा असतानाच
कोल्हापूर महानगरपालिकेत महाशिवआघाडीचा पहिला विजय झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 49 व्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे.
सुरमंजिरी लाटकर यांना 43 मते तर विरोधी भाजपा ताराराणी आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांना 32 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांनी 9 मताने भाजपा आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांचा पराभव केला आहे. यावेळी शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहिले होते. याठिकाणी गेल्या चार वर्षापासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे.

दरम्यान महापौरपदाच्या निवडणूकच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व्हीप लागू करण्यात आला होता. तसंच सर्वांना सहलीसाठी बाहेर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची बैठक शासकीय विश्रामधाम येथे पार पडली होती. या बैठकीत लाटकर यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या 49 व्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे.

COMMENTS