मुंबईतील राष्ट्रवादीचा माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबईतील राष्ट्रवादीचा माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक धक्ता बसणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नसतानाही संजय दिना पाटील यांनी मात्र ईशान्य मुंबईमध्ये पक्षाची बाजू सांभाळली होती. परंतु आता तेच
शिवसेनेत जाणार असल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय दिना पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आहे. संजय दिना पाटील हे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये भाजपच्या किरीट सोमय्यांनी त्यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आणि भाजपचे मनोज कोटक इथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. या पराभवामुळे ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS