अशोक चव्हाणांचा आरोप खरा ठरला, भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते ?

अशोक चव्हाणांचा आरोप खरा ठरला, भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते ?

नांदेड -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप खरा ठरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कालच अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते पहावयास मिळाले आहेत. नांदेडचे नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपच्या कार्यक्रमात नांदेडचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी उपस्थिती लावली होती.

गोरठेकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमस्थळी एकच चर्चा रंगली होती. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप केला होता. अशोक चव्हाणांचं म्हणणं खरं आहे का? अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

दरम्यान काँग्रेसच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर आज भाजपच्या कार्यक्रमात नांदेडचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता
काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी येणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे बदल पहायला मिळू शकतात असं बोललं जात आहे.

COMMENTS