राष्ट्रवादीतील जळगाव लोकसभा मतदारसंघाचा तिढा मिटला, शरद पवारांचा ‘यांना’ तयारीला लागण्याचा आदेश!

राष्ट्रवादीतील जळगाव लोकसभा मतदारसंघाचा तिढा मिटला, शरद पवारांचा ‘यांना’ तयारीला लागण्याचा आदेश!

जळगाव – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. परंतु काही मतदारसंघात उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली नव्हती. त्यापैकी जळगाव हा मतदारसंघ  होय. या मतदारसंघाचाही तिढा आज अखेर सुटला असून  पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना तयारीला लागा असा आदेश दिला आहे. त्यामुळे देवकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या लग्नाची तयारी सुरू करा,’ असा आदेश पवार यांनी त्यांना दिला आहे. त्यानुसार मंगळवारी लगेच देवकर यांनी तरसोद येथे जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेत प्रचाराला प्रारंभ केला असल्याची माहिती आहे. तसेच दोन दिवसांत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुका मेळावे व नंतर गावनिहाय बैठकींना सुरवात करणार असल्याची माहिती
देवकर यांनी दिली आहे.

COMMENTS