पायी हळूहळू चाला, मुखाने राष्ट्रवादी बोला, पहा हल्लाबोल यात्रेतील फोटो गॅलरी !

पायी हळूहळू चाला, मुखाने राष्ट्रवादी बोला, पहा हल्लाबोल यात्रेतील फोटो गॅलरी !

यवतमाळ – पायी हळूहळू चाला, मुखाने राष्ट्रवादी बोला या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा नागपूरच्या दिशेने निघाला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचा भलामोठा झेंडा घेऊन मोर्चाचं नेतृत्व केलं. यामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या हल्लाबोल यात्रेत जनतेच्या व्यथा समोर येत आहेत. समाजातील सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. मग घरकुलाचा प्रश्न असो की अंगणवाडी सेविकांचा. त्यामुळे या खोटारड्या सरकारचा आम्ही विरोधात हल्लाबोल करणारच असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या सरकारला धडा शिकवू या शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

 

COMMENTS