राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदाराच्या चिरंजीवाचा शिवसेनेत प्रवेश !

राष्ट्रवादीला धक्का, माजी खासदाराच्या चिरंजीवाचा शिवसेनेत प्रवेश !

मुंबई –  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असून माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. धैर्यशील माने यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आपल्या सर्व सदस्यत्वाचा राजीनामा रास्ट्रवादीच्या पक्ष श्रेष्ठींकड पाठविला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांना सोडण्यावरून माने गट नाराज होता. त्यामुळे निवेदिता माने यांनी हे पाऊल उचललं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. त्यामुळे हातकणंगलेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS