पोलीस चौकशीनंतरच निर्णय, मुंडेना दिलासा

पोलीस चौकशीनंतरच निर्णय, मुंडेना दिलासा

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर याबाबत धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच यावर खुलासा केला होता. मुंडे यांच्या या पोस्टनंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजपच्यावतीने राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तातडीनं निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळं मुंडे यांचं मंत्रिपद जाणार अशी चर्चा रंगत होती.

याच दरम्यान मुंडे यांच्यावर भाजप नेते कृष्णा हेडगे व मनीष धुरी यांनी देखील संबंधित महिलेवर आरोप केले. त्यामुळं ही महिला ‘ब्लॅकमेलर’ असल्याचं समोर आलं. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा मुद्दा प्रामुख्यानं चर्चिला गेला. चर्चेअंती मुंडे यांचा राजीनामा घाईघाईनं न घेण्याचा निर्णय झाला. पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पक्षाच्या पातळीवर पुढील निर्णय घेण्याबाबत बैठकीत एकमत झाल्याचं समजतं. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

त्यामुळे विविध आरोपांमुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तूर्तास अबाधित राहणार आहे. लगेचच कुठल्याही निष्कर्षाप्रत येऊन त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.

COMMENTS