राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच धक्का, ‘या’ नेत्याचा उमेदवारी अर्ज बाद!

राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच धक्का, ‘या’ नेत्याचा उमेदवारी अर्ज बाद!

पुणे – निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. पक्षाचा अधीकृत एबी फार्म नसल्याने प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला आहे.दुसरीकडे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे हे आता राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार ठरण्याची चिन्हं आहेत. राहुल कलाटे यांनी चिंचवड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी कालच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतून भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. परंतु त्यांच्याविरोधातील मोठा स्पर्धक म्हणून असलेले प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

COMMENTS