नाशिकमध्ये दराडे बंधूंची करामत, महिन्यात दोन आमदार घरात, कोकणात डावखरेंनी गड राखला !

नाशिकमध्ये दराडे बंधूंची करामत, महिन्यात दोन आमदार घरात, कोकणात डावखरेंनी गड राखला !

मुंबई – नाशिक शिक्षक मतदार संघात अखेर शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बेडसे यांचा पराभव केला. किशोर दराडे यांना 24369 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार संदीप बेडसे यांना 13830 मते मिळाली. निवडूण येण्यासाठी 23990 मतांचा कोटा होता. तो दराडे यांनी दुस-या फेरीत पूर्ण केला. मतांची झालेली मोठ्या प्रमाणात फूट यामुळे दराडे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे शिवसेनला नाशिकमध्ये अच्छे दिन आले आहेत. तर दराडेंच्या घरात एका महिन्यात दोन भाऊ आमदार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात कमी मते असूनही नरेंद्र दराडे यांनी विजय घेचून आणला होता.

तर इकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे संजय मोरे यांचा पराभव केला. निरंजन डावखरे यांनी मोरे यांचा 2988 मतांनी पराभव केला. ही लढत अत्यंत चुरशीची झाली. डावखरे यांना ठरलेला कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे दुस-या पसंतीची मते मोजावी लागली. त्यामुळे त्यांनी निसटता विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला तिस-या क्रमांकावर फेकले गेले. मात्र काहीही नोंदणी नसताना त्यांनी चांगली मते मिळवली आहेत.

COMMENTS