बिग ब्रेकिंग – नारायण राणेंचा आजच भाजप प्रवेश – सूत्र

बिग ब्रेकिंग – नारायण राणेंचा आजच भाजप प्रवेश – सूत्र

मुंबई – होय नाही म्हणत आज अखेर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपात प्रवेश होत आहे. शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतरही राणेंना आज भाजपात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जागांबाबत काहीप्रमाणात तडजोड करु पण राणे यांना भाजपात घेऊ नये अशी अट शिवसेेनेनं घातली होती. त्याुळेच भाजपनं आजपर्यंत राणेंना वेटिंगवर ठेवलं होतं. मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय रााणेंचा भाजप प्रवेश होणार नाही असं सांगितलं होतं. तरीही आज राणेंना प्रवेश दिला जात आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राणेंचा भाजप प्रवेश मुंबईमध्ये होत आहे. जागावाटपावरुन आधीच युतीमध्ये तणाव आहे. त्यामुळे युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आता राणेंना प्रवेश देऊन भाजपने शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे स्पष्ट होईल. कदाचित राज्यात वेगळी राजकीय समिकरणेही पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

COMMENTS