नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या गडाला सुरुंग, ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा!

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या गडाला सुरुंग, ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा!

नांदेड – नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या गडाला सुरुंग लागला असल्याचं दिसत आहे.   अल्पसंख्याक समाजात लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मकबूल सलिम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.मकबूल सलिम यांनी बहुजन वंचित आघाडीत प्रवेश केला आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान नांदेड शहरात मुस्लिम समाजातील नामांकित व्यक्तिमत्व म्हणून मकबूल सलिम यांची ओळख आहे.नांदेडमध्ये मुस्लिम नेतृत्व काँग्रेसने उभं राहू दिलं नाही, मुसलमानांचा केवळ मतपेटी भरण्यासाठी वापर केला असल्याची टीका यावेळी सलिम यांनी केली आहे. तसेच आपण आंबडेकर यांच्या विचाराने प्रेरित होत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याचे सांगितलं आहे.

COMMENTS