नाना पटोले – उद्धव ठाकरे भेटीत आज ठरणार भाजप विरोधी रणनिती ?

नाना पटोले – उद्धव ठाकरे भेटीत आज ठरणार भाजप विरोधी रणनिती ?

भाजपचे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले हे त्यांच्याच सरकारव नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी स्वपक्षावर आणि सरकावर हल्लाबोल केला आहे. यवतमाळमधील किटकनाशक प्रकरणावरुन नाना पटोले विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. यवतमाळ किटकनाशक प्रकरणाची तुलना त्यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेशी केली आहे. या प्रकरणावरुन सरकारविरोधात मोट बांधण्यासाठी ते आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये भाजप विरोधी रणनिती ठरण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांनी भेटीसाठी राहुल गांधी यांचीही वेळ मागितली आहे.

COMMENTS