नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र

नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र

गोंदिया: देशात शेतकऱ्यांचं कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. ही अन्नदात्याची लढाई आहे. सरकारने आणलेले हे काळे कायदे रद्द करावेत. अन्यथा संविधानिक खुर्चीवर जरी बसलो असलो तरी तरी मी शेतकरी आंदोलनात सहभागी होईल, असा इशारा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

केंद्र सरकारनं केलेले तीन कायदे रद्द करावेत, यासाठी मागील १५ दिवसापासून देशातील शेतकरी दिल्लीत धडकले आहेत. दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात कोट्यावधी शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून गेल्या 15 दिवसांपासून शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये जोरबैठका सुरू असून त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालावे. मात्र, त्यांनी अजूनही या प्रकरणी लक्ष घातले नाही. टिकरी बॉर्डरवर शेतकरी मृत्यू पावला. संविधानिक पदावर असलो तरी मी पहिल्यांदा शेतकरी आहे. काळे कायदे रद्द केले नाही तर आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

 

COMMENTS