विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच धक्कादायक बातमी!

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच धक्कादायक बातमी!

मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच
धक्कादायक बातमी समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनाची लागण झाली आहे. नाना पटोले यांनी लक्षणे जाणवू लागल्यामुळे कोरोना टेस्ट केली होती. यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याआधी मंत्री सुनील केदार यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान नाना पटोले यांच्या अनुपस्थितीमुळे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविनाच चालवले जाणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष हे पावसाळी अधिवेशन चालवणार आहेत. येत्या ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनापूर्वी सगळे आमदार, मंत्री, अधिकारी, विधिमंडळातले कर्मचारी यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरच त्यांना अधिवेशनात प्रवेश दिला जाणार आहे.

COMMENTS