नागपूर – मौदा नगरपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी, काँग्रेसचा पराभव !

नागपूर – मौदा नगरपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी, काँग्रेसचा पराभव !

नागपूर – मौदा नगरपंचायत (नागपूर जिल्हा) सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. तर काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यामध्ये 17 ही जागांचा निकाल हाती आला असून भाजपनं आठ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेना दोन आणि काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला याठिकाणी एकही जागा मिळाली नसून इतर उमेदवारांनी दोन जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली असून भाजपच्या भारती सोमनाथे 128 मतांनी विजयी झाल्या आहेत. सोमनाथे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

COMMENTS