मंत्रिमंडळ विस्तारावरुन महाविकास आघाडीत नाराजी, राजू शेट्टींनी दिले ‘हे’ संकेत!

मंत्रिमंडळ विस्तारावरुन महाविकास आघाडीत नाराजी, राजू शेट्टींनी दिले ‘हे’ संकेत!

नवी दिल्ली – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. या विस्तारासाठी जोरदार तयारी सुरु आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारावरून महाराष्ट्र विकास आघाडीत नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीला न बोलावल्याने आघाडीतील घटक पक्ष नाराज झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, सप, सीपीएम, बविआ, प्रहार संघटना हे महाराष्ट्र विकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घटक पक्षाबरोबर कोणतीही चर्चा झालेली नाही, तसेच त्यांना उद्याच्या विस्तारात स्थान मिळालेले नाही त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती आहे.

दरम्यान याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षालाही संधी मिळाली पाहिजे. परंतु आमच्याशी तिन्ही पक्षांनी संपर्क साधला नाही. त्यामुळे एकत्रित बैठक घेऊन आम्ही सर्व घटकपक्ष चर्चा करणार असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार असून योग्य वेळी योग्य भूमिका घेणार असल्याचे संकते राजू शेट्टी यांनी दिले आहेत.

काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची बैठक

दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी तयार असल्याचं म्हटलं आहे. तसेच ही यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री

अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, दत्ता भरणे, किरण लहामटे

काँग्रेसचे संभाव्य मंत्री

के. सी. पाडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, पश्चिम महाराष्ट्र,विश्वजित कदम,प्रणिती शिंदे, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, अमिन पटेल

शिवसेनेतील मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार

रवींद्र वायकर सुनील प्रभू, अनिल परब, प्रताप सरनाईक, डॉ.बालाजी किणीकर, उदय सामंत
दीपक केसरकर, भास्कर जाधव, संजय राठोड, आशिष जयस्वाल, बच्चू कडू, ( अपक्ष शिवसेनेला पाठिंबा दिलेले), गुलाबराव पाटील, दादा भुसे, सुहास कांदे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, डॉ.संदीपन भुमरे, राहुल पाटील, तानाजी सावंत, शंभूराजे देसाई, प्रकाश अबिटकर, डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे.

COMMENTS