महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता त्यांना मराठवाड्यातील मुळगावातून पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

दरम्यान मुंबईत उत्तम वैद्यकीय उपचार मिळावे तसंच कोणतीही रिस्क असू नये यासाठी चव्हाण यांना मुंबईत आणलं जाणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण हे कोरोना पॉझिटिव्ह असले तरी त्यांच्यात कोरोनाचे कोणतीच लक्षण आढळले नसल्याची माहिती आहे. चव्हाण यांच्या संपर्कात आलेले मराठवाड्यातील काही आमदार तसेच अधिकारीवर्ग यांना देखील खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चव्हाण हे विधान परिषदेच्या निवडणूक कार्यक्रम दरम्यान मुंबईतील विधीमंडळामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्रालयीन कर्मचारी यांनादेखील खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS