मुंबई महापालिकेतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, शिवसेनेचा महापौर तर काँग्रेस उपमहापौर होणार ?

मुंबई महापालिकेतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार, शिवसेनेचा महापौर तर काँग्रेस उपमहापौर होणार ?

मुंबई – राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेतही भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं रणनिती आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.

दरम्यान महापौर आणि उपमहापौरपदासाठी 18 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची मुदत असून 22 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीनं महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तर उपमहापौरपदासाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याची शक्यता आहे. सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे 83, शिवसेनेचे 94, काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत.

COMMENTS