जागावाटपासंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठक, राजू शेट्टींसाठी ‘ही’ जागा सोडणार!

जागावाटपासंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठक, राजू शेट्टींसाठी ‘ही’ जागा सोडणार!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. जागावाटप आणि उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसनं ही बैठक आज मुंबईत बोलावली असुन या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह दिग्गज नेते उपस्थित आहेत.
या बैठकीत मित्र पक्ष राष्ट्रवादी आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेला कोणत्या जागा सोडायच्या याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे.

काँग्रेसतर्फे राजू शेट्टी यांना सांगली किंवा वर्धा मतदारसंघ दिला जाणार असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीबरोबर काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याबाबतही आज निर्णय होणार आहे. त्याचबरोबर काही मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS