मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक, विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय!

मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक, विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत उमेदवार निवडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील प्रत्येक मतदारसंघातून तीन इच्छुकांचे नावंं ठरवण्यात येणार असून ही नावे दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर या तीन पैकी एका उमेदवाराचं नाव दिल्लीतील निवडणूक समिती निश्चिती करणार आहे.

दरम्यान मुंबई काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही संपलेले नाही. मुंबईतील काही जागांसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे गटबाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विधानसभा उमेदवार निवडीबाबत काँग्रेसने एक समिती बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या समितीली पक्षातील गटबाजी थोपवण्यात यश येणार का हे पाहण गरजेचं आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उभारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसला कितपत यश मिळणार हे आगामी निवडणुकीनंतरच समजणार आहे.

COMMENTS