मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती!

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती!

मुंबई – मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणत्या नेत्याची नियुक्ती केली जाणार याकडे लक्ष लागलं होतं. याबाबत आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी हायकमांडने ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ गायकवाड यांच्यावर मुंबईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने एकनाथ गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर काँग्रेस हायकमांडने काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची तर मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आता मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही गायकवाड यांच्याकडेच देण्यात आलं आहे.

तसेच एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते 3 वेळा धारावीमधून आमदार झाले होते. तसेच त्यांनी राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. तसेच त्यांनी लोकसभेमध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंनी त्यांचा पराभव केला होता.

COMMENTS