मुंबई एपीएमसीत भाजपला महाविकास आघाडीचा धक्का, सर्व उमेदवार पराभूत !

मुंबई एपीएमसीत भाजपला महाविकास आघाडीचा धक्का, सर्व उमेदवार पराभूत !

मुंबई – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमधून यंदा सुमारे ९३ टक्के मतदान झालं होतं. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी व चार व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी हे मतदान झालं. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांमध्ये होती. त्यात महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे.

दरम्यान भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे यांनी के. डी. मोरे यांना पराभवाची धूळ चारली. मसाला मार्केटमधून विजय भुता यांनी कीर्ती राणा यांचा पराभव केला आहे. धान्य मार्केटमधून निलेश विरा विजयी झाले आहेत. कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळुंज निवडून आले आहेत. त्यांनी राजेंद्र शेळके यांचा पराभव केला. कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केटमधून संजय पानसरे यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. अमरावती विभागातून काँग्रेसचे प्रवीण देशमुख व शिवसेनेचे माधव जाधव विजयी झाले आहेत.

COMMENTS