संभाजीराजेंकडून पूरग्रस्तांसाठी पाच कोटींची मदत जाहीर!

संभाजीराजेंकडून पूरग्रस्तांसाठी पाच कोटींची मदत जाहीर!

मुंबई – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. याठिकाणच्या नागरिकांचे मोठे हाल झाले असून पूरग्रस्तांसाठी राज्यभरातील अनेक संस्था मदतीला धावून आल्या आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे हे देखील आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले असून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पाच कोटी रुपयांची मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं असून माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान संभाजीराजे यांनी स्वत: पूरग्रस्त भागात जाऊन पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यानंतर आता त्यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. महापूरामध्ये अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. या गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरवणे अत्यावश्यक असल्याने माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प मी केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS