ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा !

ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा !

नवी दिल्ली – मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या 6 राज्यमंत्र्यांसह 19 आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार पडणार असल्याचं दिसत आहे.

मध्य प्रदेश विधानसभेचं अधिवेशन 15 मार्चपासून सुरू होत आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. 16 मार्चला विधानसभेच्या पहिल्या सत्रात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. या आमदाराच्या समर्थनाच्या जोरावर काँग्रेसचं सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात काँग्रेसच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शिंदे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. शिंदे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS