आरक्षणाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय ?

आरक्षणाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय ?

नवी दिल्ली – आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सर्वांच्या आरक्षणात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाने देशात ५० टक्केच आरक्षण ठेवण्याची मर्यादा घालून दिली आहे. मोदी सरकारने यात आता १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. हे १० टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सर्वांसाठी असणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान हे आरक्षण सरकारी नोकरीत लागू असणार आहे, मात्र शिक्षणासाठी लागू असणार की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

COMMENTS