मनसे नेते शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर ?

मनसे नेते शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जोरदार धक्का बसला असून त्यांचे खंदे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.  मनसेच्या नेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त कारण्याबाबत शिंदे यांन राज ठाकरेंना पत्र लिहिलं असल्याची माहिती आहे.दरम्यान शिशीर शिंदे यांनी मागच्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रदीर्घ चर्चा केली असल्याची माहिती आहे. शिशीर शिंदे जर शिवसेनेत गेले तर मनसेला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीवेळी रणनीतींपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमांपासून दूर राहिले असल्याचंही पहावयास मिळालं आहे.

 

COMMENTS