मनसेच्या 27 उमेदवारांची यादी जाहीर !

मनसेच्या 27 उमेदवारांची यादी जाहीर !

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी आज शिवसेना-भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहूर केली. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २७ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.दादर माहीम मधून नितीन सरदेसाई यांचा पत्ता कापत संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महपालिकेतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना कलिना इथून उमेदवारी देण्यात आली आहे.तर ठाण्यातून अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मनसे उमेदवारांची यादी

दहिसर – राजेश येरूणकर

दिंडोशी – अरुण सुर्वे

कांदिवली पूर्व – हेमंत कांबळे

गोरेगाव – विरेंद्र जाधव

वर्सोवा – संदेश देसाई

घाटकोपर  पश्चिम – गणेश चुक्कल

वांद्रे पूर्व – अखिल चित्रे

नाशिक पूर्व – अळोक मुर्तडक

माहिम – संदीप देशपांडे

ठाणे- अविनाश जाधव

कल्याण ग्रामीण – प्रमोद राजू रतन पाटील

हडपसर – वसंत मोरे

कल्याण पश्चिम – प्रकाश भोईर

कोथरूड – किशोर शिंदे

नाशिक मध्य – नितीन भोसले

वणी – राजू उंबरकर

सिंदखेडा – नरेंद्र धर्मा पाटील

नाशिक पश्चिम – दिलीप दातीर

इगतपुरी – योगेश शेवरे

मागाठाणे – नयन कदम

कसबा पेठ – अजय शिंदे

चेंबूर – कर्णबाळा दुनबळे

कलिना – संजय तुर्डे

शिवाजीनगर – सुहास निम्हण

बेलापूर – गजानन काळे

हिंगणघाट – अतुन वंदिले

तुळजापूर – प्रशांत नवगिरे

 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेचा मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. तसेच 5 ऑक्टोबररोजी ते पहिली प्रचारसभा घेणार आहेत.

COMMENTS