महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर!

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर!

मुंबई- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या 11 जागांसाठी 16 जुलैला मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. 6 जुलैपासून फॉर्म भरायला सुरवात होणार आहे. तर फॉर्म माघार घेण्याची अंतिम तारीख ही 9 जुलै असणार आहे. आज सायंकाळी निवडणूक आयोगाकडून पत्रका द्वारे हा निवडणूक कार्यक्रम कळवण्यात आला आहे.

माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, जयदेव गायकवाड, अनिल परब, नरेंद्र पाटील, जयंत पाटील ( शेकाप), सुनीलज तटकरे, अमरसिंह पंडित, महादेव जानकर, गिरकर विजय यांची 27 जुलै रोजी मुदत संपणार असुन या जागांसाठी 16 जुलैला मतदान होईल.

COMMENTS